BMC GNM Nursing Admission 2025 बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) GNM नर्सिंग प्रवेश 2025 पहा संपूर्ण माहितीबृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) अंतर्गत GNM नर्सिंग कोर्स 2025-2026 मध्ये प्रवेशासाठी इच्छुक उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी आहे. ही भरती मुंबईतील विविध प्रमुख रुग्णालयांमध्ये होत असून एकूण 350 जागांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
या लेखामध्ये तुम्हाला पात्रता, अर्जाची पद्धत, शुल्क, महत्वाच्या तारखा, रुग्णालयांचे तपशील, तसेच अधिकृत लिंकसह सर्व माहिती मिळेल.
महत्त्वाची सूचना - सदर भरती प्रक्रियेचा अर्ज करण्यापूर्वी सर्वात आधी उमेदवारांनी दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचून घेणे गरजेचे आहे. तसेच भरतीसाठी लागणारी पात्रता व इतर बाबी संपूर्ण पडताळणी करून घ्यायची आहे. त्यानंतरच आपला अर्ज भरायचा आहे अथवा करायचा आहे. भरती संबंधित भरपूर प्रमाणामध्ये फसवणुकी होत असतात त्याकरिता उमेदवारांनी सतर्क रहावे. त्यास आम्ही जबाबदार नाही.
BMC GNM Nursing Admission 2025
तपशील | माहिती |
---|---|
संस्था | बृहन्मुंबई महानगरपालिका (MCGM/BMC) |
कोर्सचे नाव | जनरल नर्सिंग अॅण्ड मिडवायफरी (GNM) 2025-26 |
कोर्स कालावधी | 3 वर्षे |
जाहिरात क्रमांक | RNCH/प्र.अ/1/3227 |
प्रवेश प्रकार | पूर्ण वेळ, निवासी कोर्स |
रुग्णालय व जागा तपशील
एकूण 350 जागा मुंबईतील विविध रुग्णालयांमध्ये वाटप केलेल्या आहेत. खालीलप्रमाणे तपशील
अ. क्र. | रुग्णालयाचे नाव | ठिकाण | संपर्क क्रमांक |
---|---|---|---|
1 | डॉ. रू. न. कूपर हॉस्पिटल नेटवर्क | विलेपार्ले (पश्चिम), मुंबई – 400 056 | 26207254 |
2 | श्री हरीलाल भगवती रुग्णालय | बोरीवली (पश्चिम), मुंबई – 400 103 | 28932461 |
3 | रा. ए. स्मारक रुग्णालय | परळ, मुंबई – 400 012 | 24136051 |
4 | बा. य. न. नायर रुग्णालय | ए. एल. नायर रोड, मुंबई – 400 008 | 23081490-99 |
5 | लो. टि. म. स. रुग्णालय | सायन, मुंबई – 400 022 | 24076381-90 |
👉 एकूण जागा – 350
शैक्षणिक पात्रता
प्रवर्ग | आवश्यक किमान गुण |
---|---|
सर्वसाधारण | 12वी (Physics, Chemistry, Biology) मध्ये किमान 40% गुण |
मागासवर्गीय | किमान 35% गुण |
नोंद – उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्डामधून 12वी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे.
वयोमर्यादा
- किमान वय – 17 वर्षे
- कमाल वय- 35 वर्षे
- वयोमर्यादा गणना – 31 जुलै 2025 रोजी लागू
अर्ज शुल्क
प्रवर्ग | शुल्क |
---|---|
खुला प्रवर्ग | ₹727/- |
राखीव प्रवर्ग (SC/ST/OBC/EWS) | ₹485/- |
भरणा पद्धत – फक्त ऑनलाइन माध्यमातून
अर्ज करण्याची पद्धत
उमेदवारांनी फक्त ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्जाची प्रक्रिया अधिकृत संकेतस्थळावर 17 जुलै 2025 पासून सुरू होईल. अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावी लागतील.
महत्वाच्या तारखा
घटक | तारीख |
---|---|
अर्ज सुरू होण्याची तारीख | 17 जुलै 2025 |
अर्ज करण्याची अंतिम तारीख | 27 जुलै 2025 |
कोर्सची सुरुवात | 01 ऑगस्ट 2025 |
महत्वाच्या लिंक
तपशील | लिंक |
---|---|
शॉर्ट नोटिफिकेशन | Click Here |
जाहिरात (PDF) | Available Soon |
ऑनलाईन अर्ज लिंक | Apply Online (17 जुलैपासून) |
अधिकृत वेबसाइट | Click Here |
इतर महत्वाची माहिती
- निवड प्रक्रिया– उमेदवारांची निवड HSC (12वी) च्या गुणांच्या आधारे गुणवत्ता यादीद्वारे होईल.
- रहिवासी सुविधा – निवड झालेल्या उमेदवारांना निवासी सुविधा पुरवण्यात येईल.
- प्रशिक्षण माध्यम – इंग्रजी व मराठी भाषेत
- प्रशिक्षण कालावधी – 3 वर्षांचा निवासी अभ्यासक्रम
कोण अर्ज करू शकतो?
✅ महिलांकरिता खुला प्रवेश
✅ मुंबई महानगर क्षेत्रातील विद्यार्थ्यांना प्राधान्य
✅ आरक्षण धोरण शासनाच्या नियमानुसार
✅ समाजकल्याण प्रमाणपत्राची आवश्यकता आरक्षित प्रवर्गासाठी
नर्सिंगमध्ये करिअर का करावे?
GNM नर्सिंग कोर्स हा एक व्यावसायिक आणि समाजोपयोगी कोर्स असून, यामध्ये प्रशिक्षण घेतल्यानंतर विद्यार्थी विविध रुग्णालये, आरोग्य केंद्रे, शासकीय संस्था, तसेच खाजगी क्षेत्रात नोकरीस पात्र ठरतात. या कोर्समुळे तुम्हाला
- समाजसेवा करण्याची संधी
- शाश्वत नोकरीची संधी
- सरकारी व खासगी क्षेत्रात भरपूर मागणी
- पुढील शिक्षणासाठी (B.Sc Nursing, ANM इत्यादी) संधी
संपर्क
कोणत्याही शंका किंवा मदतीसाठी खालील रुग्णालयांशी संपर्क साधू शकता
- कूपर हॉस्पिटल – 26207254
- भगवती हॉस्पिटल – 28932461
- नायर हॉस्पिटल – 23081490
- सायन हॉस्पिटल – 24076381
- रा.ए. स्मारक रुग्णालय – 24136051
निष्कर्ष
जर तुम्हाला आरोग्य क्षेत्रात सेवा देण्याची इच्छा असेल, तर BMC GNM Nursing Admission 2025 ही एक उत्तम संधी आहे. योग्य पात्रता, योग्य वेळेत अर्ज, आणि चिकाटीने शिकण्याची तयारी असेल, तर तुमचं करिअर या कोर्समधून घडू शकतं.
27 जुलै 2025 ही शेवटची तारीख आहे, त्यामुळे आजच तयारी सुरू करा!
3 thoughts on “BMC GNM Nursing Admission 2025 | बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) GNM नर्सिंग प्रवेश 2025 पहा संपूर्ण माहिती”