Pimpari Chinchwad Mahanagarpalika Bharti 2025 मित्रांनो पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातर्फे ‘पवित्र प्रणाली”अंतर्गत प्राथमिक शिक्षक पदांसाठीची भरती टप्पा २ जाहीर करण्यात आली असून, सदर भरती प्रक्रियेमध्ये मुलाखत न घेता थेट निवड प्रक्रिया होणार आहे. मित्रांनो तुम्हालाही पिंपरी चिंचवड महानगरपालिका (PCMC) मध्ये नोकरी मिळवायचे असेल तर ही माहिती तुमच्यासाठी आहे.
Pimpari Chinchwad Mahanagarpalika Bharti 2025
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातर्फे ‘पवित्र प्रणाली”अंतर्गत प्राथमिक शिक्षक पदांसाठीची भरती टप्पा २ जाहीर करण्यात आले आहे. त्याकरिता लागणारी पात्रता व निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना लवकरात लवकर आपले अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करायचे आहेत. शैक्षणिक क्षेत्रामध्ये नोकरी मिळवण्याची ही सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. तर चला जाणून घेऊया या भरती बद्दलची सविस्तर माहिती. Pimpari Chinchwad Mahanagarpalika Bharti 2025
महत्त्वाची सूचना - सदर भरती प्रक्रियेचा अर्ज करण्यापूर्वी सर्वात आधी उमेदवारांनी दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे. तसेच भरतीसाठी लागणारी पात्रता व इतर बाबी संपूर्ण पडताळणी करून घ्यायची आहे. त्यानंतरच आपला अर्ज भरायचा अथवा करायचा आहे. भरती संबंधित भरपूर प्रमाणात फसवणुकी होत असतात त्याकरिता उमेदवारांनी सतर्क रहावे. त्याकरिता आम्ही जबाबदार नाही.
भरतीचे नाव – पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2025
भरतीचा विभाग – पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत सदर भरती जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे.
एकूण पदे – पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत होत असलेल्या या भरतीमध्ये एकूण 52 रिक्त जागा भरण्यात येणार आहे.
पदाचे नाव – या भरतीमध्ये शिक्षक हे पद भरण्यात येणार आहे.
शैक्षणिक पात्रता – पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत होत असलेल्या या भरतीमध्ये शैक्षणिक पात्रता ही पदाच्या आवश्यकतेनुसार असणार आहे. (सविस्तर माहितीसाठी उमेदवारांनी जाहिरात वाचायची आहे)
दरमहा वेतन –
- अंडर ग्रॅज्युएट टीचर इयत्ता १ ते ५ वी १६,०००/-रुपये प्रतिमाह
- ग्रॅज्युएट टीचर इयत्ता ६वी ते ८वी १६,०००/- रुपये प्रतिमाह
वयोमर्यादा – पिंपरी चिंचवड महानगरपालिके अंतर्गत होत असलेल्या या भरतीमध्ये 18 वर्ष ते 43 वर्षे वयापर्यंतची वयोमर्यादा देण्यात आली आहे.
भरतीचा कालावधी – अधिकृत जाहिरातीमध्ये भरतीचा कालावधी स्पष्ट पद्धतीने नमूद केलेला नाही.
अर्ज करण्याची पद्धत – सदर भरतीसाठी इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
अर्ज सुरू दिनांक- ०१ मे २०२५ पासून अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे. Pimpari Chinchwad Mahanagarpalika Bharti 2025
नोकरीचे ठिकाण – निवड होणाऱ्या उमेदवारास पुणे या ठिकाणी नोकरी मिळणार आहे.
भरतीची पीडीएफ जाहिरात व अर्ज करण्याची लिंक खाली दिली आहे.
Pimpari Chinchwad Mahanagarpalika Bharti 2025 Online Apply
असा करा अर्ज
- पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत होत असलेल्या या भरतीमध्ये एकूण 52 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यामध्ये शिक्षक हे पद असून यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता ही पदानुसार वेगवेगळी देण्यात आली आहे. याबद्दलची सविस्तर माहिती वरती दिली आहे.
- सदर भरतीसाठी इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अर्ज करायचे आहेत.
- अर्ज सुरू होण्याची तारीख देखील वरती दिली आहे.
तसेच या भरतीसाठीच्या इतर आवश्यक पात्रता देखील सांगितल्या आहेत. यामध्ये
- १ली ते इयत्ता ५वी व ६वी ते ८वी या गटामधील पदांकरिता अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 (TAIT) परीक्षेपूर्वी शिक्षक पात्रता परीक्षा (TET/CTET) उत्तीर्ण असणारे उमेदवारच अर्ज करू शकणार आहेत. तसेच डिसेंबर 2022 मध्ये CTET करिता प्रविष्ट उमेदवारांचा निकाल मात्र TAIT परीक्षानंतर लागला असला तरी उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र ठरणार आहे.
- ६वी ते ८वी या गटांमधील विज्ञान-गणित या विषयांसाठी उमेदवार शिक्षक पात्रता परीक्षा (TET/CTET) गणित-विज्ञान विषय घेऊन TET – PAPER-2/CTET-PAPER-2 उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.
- 6वी व इयत्ता 8वी या गटामधील भाषा या विषयांकरिता उमेदवार शिक्षक पात्रता परीक्षा (TET/CTET) गणित-विज्ञान अथवा सामाजिक शास्त्र यापैकी कोणताही विषय घेऊन TET – PAPER-2/CTET-PAPER-2 उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.
- १ली ते ८वी/इयत्ता ९वी ते १२वी/अध्यापक विद्यालय या गटांमधील पदांकरिता अर्ज करणारा उमेदवार हा अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी २०२२ (TAIT) चाचणीसाठी प्रविष्ट असणे आवश्यक आहे. Pimpari Chinchwad Mahanagarpalika Bharti 2025
वरील लेखातील माहिती अपूर्ण असू शकते कृपया दिलेले पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करायचा आहे.

चालू नोकर भरती जाहिराती पाहण्यासाठी क्लिक करा
नोकरीची अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा
भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याकरिता क्लिक करा