Central Bank of India Apprentice Bharti 2025 | सेंट्रल बँक ऑफ इंडिया अप्रेंटिस भरती 2025 | 4500 जागांसाठी संधी | ऑनलाइन अर्जप्रक्रिया

Central Bank of India Apprentice Recruitment 2025

Central Bank of India Apprentice Bharti 2025 सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत अप्रेंटिस पदासाठी 4500 जागांची मेगा भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती Apprentices Act, 1961 अंतर्गत आर्थिक वर्ष 2025-26 साठी केली जात आहे. ही एक सुवर्णसंधी आहे ज्या अंतर्गत कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवारांना भारतभर नोकरी करण्याची संधी मिळणार आहे. चला तर जाणून घेऊया या भरतीची सविस्तर माहिती.

महत्त्वाची सूचना - सदर भरती प्रक्रियेचा अर्ज करण्यापूर्वी सर्वात आधी उमेदवारांनी दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचून घेणे गरजेचे आहे. तसेच भरतीसाठी लागणारी पात्रता व इतर बाबी संपूर्ण पडताळणी करून घ्यायची आहे. त्यानंतरच आपला अर्ज भरायचा आहे अथवा करायचा आहे. भरती संबंधित भरपूर प्रमाणामध्ये फसवणुकी होत असतात त्याकरिता उमेदवारांनी सतर्क रहावे. त्यास आम्ही जबाबदार नाही.

Central Bank of India Apprentice Bharti 2025 तक्ता

तपशीलमाहिती
भरतीचे नावCentral Bank of India Apprentice Bharti 2025
एकूण जागा4500
पदाचे नावअप्रेंटिस (Apprentice)
भरती अधिनियमApprentices Act, 1961 अंतर्गत
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
शेवटची अर्ज तारीख25 जून 2025
परीक्षा दिनांकजुलै 2025 चा पहिला आठवडा
अर्ज प्रक्रियाऑनलाइन

पदांचा तपशील

पद क्र.पदाचे नावपदसंख्या
1अप्रेंटिस (Apprentice)4500
Total4500

शैक्षणिक पात्रता

  • उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असावा.
  • पदवी 31 मार्च 2025 पूर्वी पूर्ण झालेली असावी.

वयोमर्यादा

  • 31 मे 2025 रोजी वय 20 ते 28 वर्षांच्या दरम्यान असावे.
प्रवर्गवयोमर्यादा सवलत
SC/ST5 वर्षे सवलत
OBC3 वर्षे सवलत
PWDकेंद्र शासनाच्या नियमानुसार सवलत

अर्ज शुल्क (Application Fee)

प्रवर्गशुल्क + GST
सामान्य / OBC / EWS₹800 + GST
SC/ST/महिला उमेदवार₹600 + GST
PWD (दिव्यांग)₹400 + GST

निवड प्रक्रिया

उमेदवारांची निवड खालील टप्प्यांवर आधारित असेल

  1. Online Written Test (MCQ स्वरूपात)
  2. स्थानिक भाषा चाचणी (Local Language Proficiency)
  3. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन

लेखी परीक्षेत सामान्य ज्ञान, इंग्रजी, संख्याशास्त्र, व बँकिंग जागरूकता या विषयांचा समावेश असेल.

Central Bank of India Apprentice Bharti 2025 Apply Online

ऑनलाइन अर्ज कसा करावा?

  1. उमेदवारांनी सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी
  2. “Apprentice Recruitment 2025” या लिंकवर क्लिक करावे.
  3. आपला वैयक्तिक, शैक्षणिक व इतर तपशील भरावा.
  4. आवश्यक ते कागदपत्रे अपलोड करावीत.
  5. अर्ज शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरावे.
  6. अर्ज सबमिट केल्यानंतर प्रिंटआउट ठेवावा.

महत्त्वाच्या तारखा

तपशीलतारीख
अर्ज सुरूउपलब्ध
अर्ज करण्याची अंतिम तारीख25 जून 2025
ऑनलाईन परीक्षाजुलैचा पहिला आठवडा (2025)

नोकरीचे ठिकाण

संपूर्ण भारतातील सेंट्रल बँक शाखांमध्ये उमेदवारांची नेमणूक केली जाणार आहे. हे एक Pan India level अप्रेंटिसशिप प्रोग्राम आहे.

महत्वाची सूचना

  • फक्त ऑनलाइन अर्जच मान्य केले जातील.
  • अर्ज करताना सर्व माहिती अचूक भरणे आवश्यक आहे.
  • परीक्षा शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत केला जाणार नाही.
  • उमेदवाराने स्थानिक भाषेचे ज्ञान असणे अनिवार्य आहे.
  • बँकेचा निर्णय अंतिम व बंधनकारक असेल.

महत्वाच्या लिंक्स

तपशीललिंक
जाहिरात PDFClick Here
अर्ज लिंकApply Online
अधिकृत वेबसाईटClick Here
आणखी जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा
Central Bank of India Apprentice Bharti 2025
Central Bank of India Apprentice Bharti 2025

Central Bank of India Apprentice Bharti 2025 ही भारतभर पदवीधर युवक-युवतींसाठी एक उत्तम संधी आहे. ही केवळ नोकरीची संधी नसून बँकिंग क्षेत्रात अनुभव मिळवून पुढील करिअरसाठी एक भक्कम पायरी देखील ठरू शकते. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा आणि भरतीसाठी सज्ज रहावे.

नमस्कार मी 'नरेश पारवे' मी महाराष्ट्र, पुणे, जुन्नर या ठिकानचा रहिवासी असून मी 2023 पासून ब्लॉगिंग क्षेत्रामध्ये काम करतोय. ब्लॉगिंग क्षेत्रामध्ये मला वर्डप्रेस वेबसाइट डीझाईन, कंटेंट रायटींग ची आवड आहे. कंटेंट रायटींग मध्ये मला सरकारी योजना, नोकरीविषयक जाहिरातीची सविस्तर माहिती तसेच नवनवीन अपडेट वर लिहण्याची आवड आहे. ती माहिती मी माझ्या कंटेंट रायटींग मधून या वेबसाइटद्वारे लोकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करतो.

Leave a Comment

व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा ➤ MN Nokari Logo