Ahilyanagar Kotwal Recruitment 2025
Ahilyanagar Kotwal Bharti 2025 राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. उपविभागीय अधिकारी, अहिल्यानगर यांच्या आस्थापनेवर “अहिल्यानगर कोतवाल भरती २०२५” अंतर्गत १५८ महसूल सेवक (कोतवाल) पदांसाठी मोठ्या प्रमाणात भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती पाथर्डी, संगमनेर, श्रीरामपूर, शेवगाव, श्रीगोंदा, राहाता, राहुरी, पारनेर, जामखेड, नेवासा, कोपरगाव, अहिल्यानगर आणि कर्जत या तालुक्यांमध्ये होणार आहे.
या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले असून शेवटची तारीख १८ जुलै २०२५ आहे. या भरतीविषयी संपूर्ण माहिती खाली दिली आहे.
महत्त्वाची सूचना - सदर भरती प्रक्रियेचा अर्ज करण्यापूर्वी सर्वात आधी उमेदवारांनी दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचून घेणे गरजेचे आहे. तसेच भरतीसाठी लागणारी पात्रता व इतर बाबी संपूर्ण पडताळणी करून घ्यायची आहे. त्यानंतरच आपला अर्ज भरायचा आहे अथवा करायचा आहे. भरती संबंधित भरपूर प्रमाणामध्ये फसवणुकी होत असतात त्याकरिता उमेदवारांनी सतर्क रहावे. त्यास आम्ही जबाबदार नाही.
Ahilyanagar Kotwal Recruitment 2025
भरतीचे नाव | अहिल्यानगर कोतवाल भरती २०२५ |
जाहिरात क्र. | 01/2025, 02/2025, 05/2025 & 06/2025 |
एकूण पदे | १५८ |
पदाचे नाव | महसूल सेवक (कोतवाल) |
शैक्षणिक पात्रता | किमान ४ थी पास व स्थानिक रहिवासी असणे आवश्यक |
वयोमर्यादा | ०७ जुलै २०२५ रोजी १८ ते ४० वर्षे |
अर्जाची पद्धत | ऑनलाईन |
शेवटची तारीख | १८ जुलै २०२५ |
परीक्षा | नंतर कळवण्यात येईल |
नोकरीचे ठिकाण | अहिल्यानगर जिल्हा अंतर्गत विविध तालुके |
अर्ज फी | खुला वर्ग – ₹६०० /-, मागासवर्गीय: ₹५००/- |
अधिकृत वेबसाइट | Click Here |
पदांचे तपशील – तालुका व पदसंख्या
खालील तक्त्यात तालुकानिहाय पदसंख्या देण्यात आलेली आहे
MSRTC Bharti 2025 | महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 29,000+ पदांची मोठी भरती! | पहा मुख्यमंत्री काय म्हणाले ?
तालुका | पदसंख्या |
---|---|
पाथर्डी | १३ |
संगमनेर | १६ |
श्रीरामपूर | ०८ |
शेवगाव | ०७ |
श्रीगोंदा | २० |
राहाता | ०७ |
राहुरी | १२ |
पारनेर | २१ |
जामखेड | ०६ |
नेवासा | १० |
कोपरगाव | १० |
अहिल्यानगर | १४ |
कर्जत | १४ |
एकूण | १५८ |
Ahilyanagar Kotwal Bharti 2025 साठी लागणारी शैक्षणिक पात्रता
- उमेदवार किमान ४ थी पास असणे अनिवार्य आहे.
- अर्ज करणारा उमेदवार स्थानिक रहिवासी असावा, म्हणजेच त्याचे/तिचे वास्तव्य संबंधित गावातच असावे.
वयोमर्यादा
- १८ ते ४० वर्षे वयोगटातील उमेदवार पात्र आहेत.
- वयोमर्यादा ०७ जुलै २०२५ या तारखेनुसार गणली जाईल.
- आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना शासन नियमांनुसार वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.
अर्ज फी (Application Fee)
प्रवर्ग | शुल्क |
---|---|
खुला प्रवर्ग | ₹६००/- |
मागासवर्गीय प्रवर्ग | ₹५००/- |
अर्ज करण्याची प्रक्रिया
१. सर्वप्रथम अधिकृत संकेतस्थळावर जा – Apply Online
२. “Ahilyanagar Kotwal Bharti 2025” या भरतीसाठी अर्ज करा.
३. सर्व आवश्यक माहिती भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
४. शुल्क भरून अर्ज सादर करा.
५. अर्जाची प्रत PDF स्वरूपात सेव्ह करा.
परीक्षा व निवड प्रक्रिया
- भरतीसाठी लेखी परीक्षा घेण्यात येईल.
- परीक्षेची तारीख लवकरच अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केली जाईल.
- परीक्षेच्या आधी प्रवेशपत्र अधिकृत वेबसाईटवरून डाउनलोड करता येईल.
- अंतिम निवड ही परीक्षेच्या गुणांनुसार करण्यात येईल.
आवश्यक कागदपत्रे
- शैक्षणिक प्रमाणपत्र (किमान ४ थी पास)
- रहिवासी दाखला
- जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
- आधार कार्ड / ओळखपत्र
- पासपोर्ट साईज फोटो
- अर्ज शुल्क भरल्याचा पुरावा
महत्त्वाच्या लिंक्स
तपशील | लिंक |
---|---|
जाहिरात (PDF) | Click Here |
ऑनलाईन अर्ज | Apply Online |
अधिकृत संकेतस्थळ | Click Here |

निष्कर्ष
अहिल्यानगर महसूल सेवक भरती २०२५ ही कमी शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे. केवळ ४ थी पास असलेले आणि स्थानिक रहिवासी असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. त्यामुळे योग्य पात्रता असलेल्या उमेदवारांनी १८ जुलै २०२५ अगोदर अर्ज करून ही संधी नक्कीच साधावी.