बँक ऑफ बडोदा मध्ये नोकरीची सुवर्णसंधी – पात्रता १०वी उत्तीर्ण | Bank Of Baroda Bharti 2025

Bank Of Baroda Bharti 2025 तुमच्याही शिक्षण दहावी उत्तीर्ण असेल व मित्रांनो तुम्हीही बँकिंग क्षेत्रामध्ये नोकरी शोधत आहात ? तर हा लेख तुमच्यासाठी आहे. मित्रांनो भारतामध्ये असणारी प्रतिष्ठित बँक संस्था, बँक ऑफ बडोदा यांनी 2025 मध्ये 500 ( ऑफिस असिस्टंट )शिपाई पदांसाठी जाहीर भरती सुरू केली आहे. मित्रांनो बँकिंग क्षेत्रामध्ये नोकरी मिळवण्याची ही सुवर्णसंधी तुमच्यासाठी उपलब्ध झाले आहे. ज्या उमेदवारांना या नोकरीसाठी अर्ज करायचा आहे, त्यांनी बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

Bank Of Baroda Recruitment 2025 Peon

भारतामध्ये प्रतिष्ठित असणारे बँक संस्था, म्हणजेच बँक ऑफ बडोदा ने 2025 सालात मोठी म्हणजेच 500 ऑफिस असिस्टंट शिपाई भरती सुरू केली आहे. तरी या भरतीसाठी इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करायचे आहेत. सदर भरतीचे अर्ज प्रक्रिया, भरतीची सविस्तर माहिती, अर्ज करण्याची लिंक, अर्ज करण्याची शेवटची तारीख व अधिकृत जाहिरात खाली दिली आहे. तर चला जाणून घेऊया या भरतीबद्दल सविस्तर माहिती. Bank Of Baroda Bharti 2025

महत्त्वाची सूचना - सदर भरती प्रक्रियेचा अर्ज करण्यापूर्वी सर्वात आधी उमेदवारांनी दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे. तसेच भरतीसाठी लागणारी पात्रता व इतर बाबी संपूर्ण पडताळणी करून घ्यायची आहे. त्यानंतरच आपला अर्ज भरायचा अथवा करायचा आहे. भरती संबंधित भरपूर प्रमाणात फसवणुकी होत असतात त्याकरिता उमेदवारांनी सतर्क रहावे. त्याकरिता आम्ही जबाबदार नाही

Bank Of Baroda Recruitment 2025 Notification

भरतीचे नाव – बँक ऑफ बडोदा ऑफिस असिस्टंट भरती

भरतीचा विभाग – बँक ऑफ बडोदा अंतर्गत सदर भरती जाहिरात प्रसारित करण्यात आले आहे.

भरती प्रकार – सरकारी नोकरी मिळवण्याची मोठी संधी उपलब्ध.

भरती श्रेणी – केंद्र सरकार म्हणजेच सेंट्रल गव्हर्नमेंट अंतर्गत ही भरती केली जात आहे.

एकूण पदे – बँक ऑफ बडोदा अंतर्गत होत असलेल्या या भरतीमध्ये एकूण 500 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

पदाचे नाव – सदर भरती मध्ये ऑफिस असिस्टंट म्हणजेच शिपाई या पदासाठी भरती होत आहे.

शैक्षणिक पात्रता – इयत्ता १०वी उत्तीर्ण

वयोमर्यादा – सदर भरती करता किमान 18 वर्ष व कमाल 26 वर्ष वयाची वयोमर्यादा देण्यात आली आहे.

भरती कालावधी – सदर भरती मध्ये निवड होणाऱ्या उमेदवारास कायमस्वरूपी म्हणजेच परमनंट नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी आहे.

नोकरीचे ठिकाण – निवड होणाऱ्या उमेदवारास संपूर्ण भारतात कुठेही नोकरी मिळू शकते.

दरमहा वेतन – सदर भरती मध्ये निवड होणाऱ्या उमेदवारांना 19, 500 रुपये ते 37,815 रुपये मासिक वेतन दिले जाणार आहे. तसेच उमेदवारांना महागाई भत्ता, घराचे भाडे तसेच वैद्यकीय सुविधा व इतर शासकीय सुविधा लागू होणार आहेत.

सविस्तर भरतीची अधिकृत जाहिरात, ऑनलाइन अर्जाची लिंक व अर्ज करण्याची पद्धत माहिती खाली दिली आहे.

अर्ज पद्धत – बँक ऑफ बडोदा अंतर्गत होत असलेल्या या भरतीसाठी इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत.

Bank Of Baroda Bharti 2025 Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख – सदर भरतीसाठी इच्छुक व पात्र असणारे उमेदवार हे 03 मे 2025 पासून 23 मे 2025 पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकणार आहेत.

अर्ज शुल्क

  1. सामान्य व ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांकरिता 600 रुपये
  2. अनुसूचित जाती, जमाती, दिव्यांग व महिला उमेदवारांसाठी 100 रुपये.

Bank Of Baroda Bharti 2025 Apply Online

असा करा अर्ज

  • मित्रांनो बँक ऑफ बडोदा अंतर्गत होत असलेल्या या भरतीसाठी इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने दिलेल्या तारखे अगोदर अर्ज सादर करायचे आहेत.
  • सदर भरती मध्ये एकूण 500 रिक्त जागा भरण्यात येणार असून या मध्ये ऑफिस असिस्टंट म्हणजेच शिपाई पदासाठी या जागा आहेत.
  • अर्ज करण्याची लिंक व अधिकृत जाहिरात खाली देण्यात आली आहे.
  • भरती बद्दलची सविस्तर माहिती तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख वरती दिली आहे.
  • अर्ज करण्या अगोदर उमेदवारांनी दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे.
  • सदर भरती करिता अधिकृत अधिसूचना, सविस्तर माहिती व अर्ज करण्यासाठी www.bankofbaroda.in या संकेतस्थळावर भेट द्या. Bank Of Baroda Bharti 2025
  • सदर भरती ची निवड प्रक्रिया ही तीन टप्प्यात पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये उमेदवारांची ऑनलाइन लेखी परीक्षा घेतली जाणार असून त्यामध्ये इंग्रजी, गणित, सामान्य ज्ञान व तरकीक विचारशक्ती यावर आधारित प्रश्न असणार आहेत. यानंतरच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये स्थानिक भाषेची चाचणी घेतली जाईल. व शेवटच्या टप्प्यामध्ये पात्र असणाऱ्या उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी तसेच त्यांची वैद्यकीय चाचणी घेतली जाईल.

वरील लेखातील माहिती अपूर्ण असू शकते, कृपया दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावा.

Bank Of Baroda Bharti 2025
Bank Of Baroda Bharti 2025

अधिकृत पिडीएफ जाहिरातीसाठी क्लिक करा

चालू नोकरीभरती जाहिरत्नसाठी क्लिक करा

भरतीचा ऑनलाइन अर्ज करण्यासाठी क्लिक करा

Leave a Comment