Collector Office Bharti 2025 मित्रांनो तुम्हीही चांगल्या पगाराची नोकरी शोधत आहे ? तर जिल्हाधिकारी कार्यालयात अंतर्गत नोकरी मिळवण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. तुम्हाला हे चांगल्या पगाराची नोकरी मिळवायची असेल तर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकता. सदर भरतीची जाहिरात ही जिल्हाधिकारी कार्यालयाद्वारे प्रसारित करण्यात आले आहे.
Collector Office Bharti 2025
जिल्हाधिकार्यालय अंतर्गत होत असलेल्या या भरतीमध्ये इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर अर्ज करायचे आहेत. सदर भरतीची सविस्तर माहिती खाली दिले आहे. भरती मधील शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज पद्धत, करण्याचा पत्ता व इतर माहिती जाणून घेऊया सविस्तरपणे. भरतीची जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.
महत्त्वाची सूचना - सदर भरती प्रक्रियेचा अर्ज करण्यापूर्वी सर्वात आधी उमेदवारांनी दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचून घेणे गरजेचे आहे. तसेच भरतीसाठी लागणारी पात्रता व इतर बाबी संपूर्ण पडताळणी करून घ्यायची आहे. त्यानंतरच आपला अर्ज भरायचा आहे अथवा करायचा आहे. भरती संबंधित भरपूर प्रमाणामध्ये फसवणुकी होत असतात त्याकरिता उमेदवारांनी सतर्क रहावे. त्यास आम्ही जबाबदार नाही.
भरतीचे नाव – जिल्हाधिकारी कार्यालय भरती 2025 (Collector Office Bharti 2025)
भरतीचा विभाग – सदर भरती ही जिल्हाधिकारी कार्यालय द्वारा भरती जाहिरात प्रसारित करण्यात आले आहे.
भरतीचा प्रकार – सदर भरती द्वारे सरकारी विभागांमध्ये नोकरी मिळवण्याचे उत्तम संधी उपलब्ध झाली आहे.
पदाचे नाव – सविस्तर माहिती करिता उमेदवारांनी जाहिरात पहायची आहे.
वयोमर्यादा – जिल्हाधिकारी कार्यालय अंतर्गत होत असलेल्या या भरतीमध्ये उमेदवाराचे वय हे नियुक्ती वेळी 45 वर्षापेक्षा जास्त नसावे.
भरतीचा कालावधी – पहिले ११ महिने.
शैक्षणिक पात्रता – जिल्हाधिकारी कार्यालय भरती अंतर्गत होत असलेल्या भरती मध्ये पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता दिली आहे. ( सविस्तर माहिती करता अधिकृत जाहिरात वाचायचे आहे.)
दरमहा वेतन – सदर भरती मध्ये निवड होणाऱ्या उमेदवारास ४५,०००/-रुपये मानधन दिले जाणार आहे.
अर्ज करण्याची पद्धत – सदर भरती करिता इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याचा पत्ता खाली दिला आहे.
एकूण पद – ०१
नोकरीचे ठिकाण – निवड होणाऱ्या उमेदवारास पालघर या ठिकाणी नोकरी मिळणार आहे.
अर्ज करण्याचा पत्ता – दालन क्रमांक २०२, आस्थापना शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, पालघर-बोईसर रोड, कोळगाव, ता.जि. पालघर. पिनकोड – ४०१ ४०४
अर्ज करण्याची शेवटची तारीख – सदर भरती करिता उमेदवारांना 28 मे 2025 पर्यंत अर्ज करायचे आहेत. Collector Office Bharti 2025
असा करा अर्ज
- मित्रांनो जिल्हाधिकारी कार्यालय अंतर्गत होत असलेल्या या भरतीमध्ये इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर तारखे अगोदर अर्ज करायचे आहेत.
- सदर भरतीची सविस्तर माहिती, अर्ज करण्याचा पत्ता व शेवटची तारीख वरती दिली आहे. ( सविस्तर माहिती करिता उमेदवारांनी अधिकृत जाहिरात वाचायचे आहे)
- अर्ज करणारा उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कायद्याचा पदवीधर (LLB) व तो सनदधारक असावा. Collector Office Bharti 2025
- उमेदवारास महसूलविषयक, सेवाविषयक, प्रशासनिक या सर्व प्रकारच्या कायद्यांची स्थिती तसेच विभागीय चौकशी इत्यादी बाबत ज्ञानसंपन्न असावे, जेणेकरून कायदेविषयक कार्यवाही तो कार्यक्षमतेने पार पाडू शकेल
- तसेच विद्यार्थी वकिली व्यवसायाचा किमान सात वर्षाचा अनुभव असावा.
- यामध्ये उमेदवाराने अनुभवाचे जिल्हा बार असोसिएशनचे संमती पत्र जोडणे आवश्यक आहे.
- उमेदवार मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेचे ज्ञान असावे.
- यामध्ये पात्र ठरणाऱ्या उमेदवारांची मुलाखत घेण्यात येणार आहे. पात्र उमेदवारांनी मुलाखतीच्या वेळी ओरिजनल प्रमाणपत्र सोबत उपस्थित राहणे गरजेचे आहे. तसेच होणारी मुलाखतीची वेळ व दिनांक याबाबतची माहिती त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर (https://palghar.gov.in) प्रसिद्ध करण्यात येईल.
वरील लेखातील माहिती अपूर्ण असू शकते, कृपया दिलेली अधिकृत पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करायचा आहे.

चालू नोकर भरती जाहिरातींसाठी क्लिक करा.
अधिकृत पीडीएफ जाहिरात पाहण्याकरिता क्लिक करा.
अर्ज करिता क्लिक करा.