DCC Bank Bharti 2025 मित्रांनो नमस्कार! तुम्ही ही बँकिंग क्षेत्रामध्ये नोकरी शोधत असाल तर हा लेख तुमच्यासाठी आहे. ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित, ठाणे या ठिकाणी सुरक्षा रक्षक पदाकरिता पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. सदर भरती मध्ये एकूण 04 रिक्त पदे कंत्राटी तत्त्वावर भरण्यात येणार आहे. भरतीसाठी इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांना लवकरात लवकर आपापले अर्ज सबमिट करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 मे 2025 देण्यात आली आहे.
DCC Bank Bharti 2025
भरतीचे नाव | जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. भरती २०२५ |
एकूण पदे | ०४ रिक्त पदे |
पदाचे नाव | हत्यारी सुरक्षारक्षक’ |
अर्ज पद्धत | ऑफलाइन पद्धतीने |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | ३० मे २०२५ |
तुम्हालाही या भरतीमध्ये सहभागी होऊ नोकरी मिळवायचे असेल तर हा लेख संपूर्ण वाचा. सदर व ते साठी अर्ज करण्याची शेवटची मुदत दिनांक 30 मे 2025 दिले आहे. भरतीसाठी इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांना सर्व आवश्यक कागदपत्रे साक्षंकित प्रति सह स्वतःचे छायाचित्र जोडून खाली दिलेल्या पत्त्यावर रजिस्टर ए.डी. द्वारे लवकरात लवकर अर्ज करायचे आहेत. सदर भरतीसाठीची संबंधित पदे मुलाखती द्वारे भरले जाणार आहेत. भरतीची सविस्तर माहिती व अधिकृत जाहिरात खाली दिली आहे. सदर भरतीची सविस्तर माहिती आपण पुढे जाणून घेऊयात.
महत्त्वाची सूचना - सदर भरती प्रक्रियेचा अर्ज करण्यापूर्वी सर्वात आधी उमेदवारांनी दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचून घेणे गरजेचे आहे. तसेच भरतीसाठी लागणारी पात्रता व इतर बाबी संपूर्ण पडताळणी करून घ्यायची आहे. त्यानंतरच आपला अर्ज भरायचा आहे अथवा करायचा आहे. भरती संबंधित भरपूर प्रमाणामध्ये फसवणुकी होत असतात त्याकरिता उमेदवारांनी सतर्क रहावे. त्यास आम्ही जबाबदार नाही.
DCC Bank Bharti 2025 Maharashtra
भरतीचे नाव – जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड भरती 2025 (DCC Bank Bharti 2025)
भरती विभाग – सदर भरती ही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक द्वारा होत आहे.
एकूण पदे – जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मध्ये होत असलेल्या या भरतीमध्ये एकूण 04 रिक्त पदे (कंत्राटी स्वरूपात) भरण्यात येणार आहे.
पदाचे नाव – सदर भरती मध्ये ‘हत्यारी सुरक्षारक्षक’ या पदाकरता भरती होत आहे.
वयोमर्यादा – सदर भरती करता उमेदवाराचे वय हे 45 वर्ष वयापेक्षा कमी असावे.
नोकरीचे ठिकाण – निवड होणाऱ्या उमेदवारास ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड, ठाणे या ठिकाणी नोकरी मिळणार आहे.
भरती निवड – उमेदवाराची निवड ही थेट मुलाखती द्वारे होणार आहे.
पात्रता व अट – सदर भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवार हा भारतीय लष्करी सेवेमधून सेवानिवृत्त झालेला असावा. तसेच उमेदवाराकडे स्वतःचे वैध आणि कायदेशीर शस्त्र असणे आवश्यक आहे. यापैकी कोणतीही अट अपूर्ण करणाऱ्या उमेदवारास अपात्र ठरवलं जाऊ शकतं.
पगार – निवड होणाऱ्या उमेदवारास देण्यात येणारा पगार हा मुलाखतीनंतर ठरवण्यात येईल. (जाहिरात पहायची आहे)
DCC Bank Bharti 2025 Last Date
अर्ज करण्याची पद्धत – सदर भरतीसाठी इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत
अर्ज करण्याचा पत्ता – ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. केंद्र कार्यालय – छत्रपती शिवाजी पथ, ठाणे (प) पो. बॉ. नं. १९ पिनकोड – ४०० ६०१ (DCC Bank Bharti 2025)
DCC Bank Bharti 2025 Application Process
असा करा अर्ज
मित्रांनो जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत होत असलेल्या या भरतीमध्ये ‘हत्यारी सुरक्षारक्षक’या पदाकरता एकूण 04 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर तारखे अगोदर अर्ज करायचे आहेत.
अर्ज करण्याचा पत्ता तसेच अर्ज करण्याची अंतिम तारीख वरती दिली आहे.
उमेदवारांनी अर्ज करण्या अगोदर दिलेली अधिकृत पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे मगच अर्ज करायचा आहे.
अर्ज करतेवेळी खालील माहिती स्पष्टपणे नमूद करणे आवश्यक आहे जसे की-
- उमेदवाराचे पूर्ण नाव
- पत्रव्यवहार पत्ता
- जन्मदिनांक
- शैक्षणिक अर्हता
- अनुभव
- मोबाईल क्रमांक
- ई-मेल पत्ता
- लष्करी सेवेचा पुरावा
इच्छुक व पात्र उमेदवारांनी आपापले अर्ज लवकरात लवकर सर्व प्रमाणपत्रांसहित तसेच स्वतःचे छायाचित्र त्यावर चिटकवून रजिस्टर ए.डी. द्वारे बँकेच्या पत्त्यावर दिलेल्या तारखे अगोदर पोहोचेल असे पाठवायचे आहे.
टीप -जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक द्वारा होत असलेली भरती ही पूर्ण पणे कंत्राटी तत्त्वावर असून निवड होणाऱ्या उमेदवाराचा समावेश हा बँकेमध्ये कायम सेवेत केला जाणार नाही. शिवाय ही भरती प्रक्रिया रद्द करण्याचा अथवा त्यामध्ये बदल करण्याचा संपूर्ण अधिकार बँक व्यवस्थापनाकडे राखून ठेवला आहे.
वरील लेखातील माहिती अपूर्ण असू शकते, कृपया उमेदवारांनी दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करायचा आहे.

चालू नोकरभरती जाहिरातीसाठी | क्लिक करा |
अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी | क्लिक करा |
वेबसाईट वर जाण्यासाठी | क्लिक करा |
1 thought on “जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. भरती 2025 | पद – सुरक्षारक्षक | DCC Bank Bharti 2025”