Maharashtra Anganwadi Supervisor Bharti 2025 मित्रांनो महिला व बालविकास विभाग अंतर्गत महाराष्ट्र राज्य एकात्मिक बाल विकास सेवा योजना मार्फत गट क सवर्गामधील मुख्य सेविका या पदाकरिता भरती प्रक्रिया ची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. तुम्हालाही ही नोकरी मिळवायची असेल तर हा लेख तुमच्यासाठी आहे.
Maharashtra Anganwadi Supervisor Bharti 2025
महिला व बालविकास विभाग अंतर्गत महाराष्ट्र राज्य एकात्मिक बाल विकास सेवा योजना मार्फत गट कसा वर्गामध्ये मुख्य सेविका या पदाकरिता भरती सुरू झाली असून यामध्ये एकूण 272 रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवाराकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. उमेदवारांनी विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करायचा आहे. सदर भरतीची सविस्तर माहिती पुढे दिली आहे. उमेदवारांनी दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची संपूर्ण माहिती तसेच अर्जाची लिंक खाली दिली आहे.
महत्त्वाची सूचना - सदर भरती प्रक्रियेचा अर्ज करण्यापूर्वी सर्वात आधी उमेदवारांनी दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे. तसेच भरतीसाठी लागणारी पात्रता व इतर बाबी संपूर्ण पडताळणी करून घ्यायची आहे. त्यानंतरच आपला अर्ज भरायचा अथवा करायचा आहे. भरती संबंधित भरपूर प्रमाणात फसवणुकी होत असतात त्याकरिता उमेदवारांनी सतर्क रहावे. त्याकरिता आम्ही जबाबदार नाही
भरतीचे नाव – अंगणवाडी मुख्य सेविका भरती 2025 (Maharashtra Anganwadi Supervisor Bharti 2025)
भरतीचा विभाग – महिला व बालविकास विभागात द्वारा ही भरती जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे.
भरतीप्रकार – सरकारी नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.
भरती श्रेणी – महाराष्ट्र शासन म्हणजेच महाराष्ट्र गव्हर्मेंट नोकरी मिळवण्याची उत्तम संधी उपलब्ध.
एकूण पदे – सदर भरती मध्ये 272 रिक्त जागा भरण्यात येणार आहे.
पदाचे नाव – महिला व बालविकास विभाग अंतर्गत होत असलेल्या या भरतीमध्ये मुख्य सेविका (गट क ) संवर्ग या पदाकरता भरती होत आहे.
भरती अंतर्गत कार्यालय – यामध्ये एकूण 104 नागरी प्रकल्प.
लागणारी शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने कोणत्याही संविधानिक विद्यापीठ मध्ये कोणत्याही शाखेतील पदवी प्राप्त केलेली असावी. (सविस्तर माहिती करता उमेदवारांनी जाहिरात वाचायची आहे)
दरमहा पगार – मुख्य सेविका या पदाकरता निश्चित करण्यात आलेली दरमहा वेतन श्रेणी ३५,४०० रुपये ते १,१२,४०० रुपये एवढी आहे.
अर्ज करण्याची पद्धत – महिला व बालविकास विभाग अंतर्गत होत असलेल्या या भरतीमध्ये इच्छुक पात्र असणाऱ्या उमेदवारांना फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
वयोमर्यादा – या भरतीमध्ये अर्जदाराचे वय हे किमान 21 वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे. तसेच अर्जदाराचे कमाल वय हे 45 वर्षापेक्षा अधिक नसले पाहिजे.
Maharashtra Anganwadi Supervisor Bharti 2025 Last Date
अर्ज करण्याची शेवटची मुदत ही 20 मे 2025 रोजी रात्री ११ वाजून ५५ वाजेपर्यंत आहे
लागणारे आवश्यक कागदपत्रे/प्रमाणपत्रे
- अर्जदाराच्या नावाचा पुरावा म्हणजेच आधार कार्ड
- अर्जदाराच्या वयाचा पुरावा म्हणजेच जन्म नोंदणी दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला.
- शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र म्हणजेच दहावी बारावी/डिप्लोमा पदवी प्रमाणपत्र.
- उमेदवाराचा मागासवर्गीय असल्याबाबतचा जात प्रमाणपत्र.
- हिंदी व मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा.
- संगणक ज्ञान पुरावा म्हणजेच एमएस-सीआयटी प्रमाणपत्र.
- लहान कुटुंबाचे विहित नमुना प्रमाणपत्र.
- संबंधित बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी निर्गमित केलेले पदोन्नती पात्रता विहित नमुना प्रमाणपत्र. म्हणजेच अनुभव प्रमाणपत्र.
- नावामध्ये बदल झाला असल्यास त्याचा पुरावा.
परीक्षा पद्धत
- परीक्षा पद्धतीमध्ये उमेदवाराची निवड ही ऑनलाईन परीक्षेच्या आधारे केली जाणार आहे.
- घेण्यात येणारी परीक्षा ही एकाच वेळी महाराष्ट्रभर निश्चित केलेल्या परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे.
- परीक्षेचे स्वरूप हे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्नपत्रिकाचे असणार आहे.
- प्रत्येक प्रश्नासाठी ०२ गुण निश्चित करण्यात आले आहेत.
- उमेदवारांना परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेश पत्र उपलब्ध करून देण्यात येणार असून त्यावर परीक्षेचे तपशील नमूद केलेले असणार आहे.
- परीक्षेच्या तारखेबाबतची माहिती विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे.
Maharashtra Anganwadi Supervisor Bharti 2025 Apply Online
अशा पद्धतीने करा अर्ज
- मित्रांनो महिला व बालविकास विभाग अंतर्गत होत असलेल्या या भरतीमध्ये उमेदवारांना फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. याबद्दलची सविस्तर माहिती वरती दिली आहे.
- उमेदवाराने प्रथमता फक्त आणि फक्त विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज करायचा आहे.
- अर्ज भरण्याची सुरुवात 30 एप्रिल 2025 पासून झाली आहे.
- अर्ज करण्याची शेवटची मुदत ही 20 मे 2025 रोजी रात्री ११ वाजून ५५ वाजेपर्यंत आहे.
- अर्ज करतेवेळी उमेदवारांनी स्वतःची पात्रता व्यवस्थित तपासून घेऊनच अर्ज करायचा आहे.
- अर्ज करतेवेळी उमेदवारांनी त्याच्या संपूर्ण पात्रता अटी व शर्ती काळजीपूर्वक वाचून घ्यायच्या आहेत.
- उमेदवाराकडे हिंदी व मराठी भाषेत पास किंवा सुट्टीस पात्र असणे अनिवार्य आहे.उमेदवाराकडे एमएस-सीआयटी प्रमाणपत्र अथवा समक्ष संगणक अरहता असणे आवश्यक आहे.
- उमेदवाराने अंगणवाडी सेविका अथवा मिनी अंगणवाडी सेविका म्हणून एक जानेवारी 2025 पर्यंत दहा वर्ष विना खंड व नियमित सेवा पूर्ण केलेले असावे, अथवा सध्या देखील कार्यरत असणे आवश्यक आहे.

वरील लेखातील माहिती अपूर्ण असू शकते, कृपया अर्ज करण्यापूर्वी दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करायचा आहे.
चालू नोकर भरती जाहिरातींसाठी क्लिक करा
पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी क्लिक करा
1 thought on “अंगणवाडी मुख्य सेविका भरती 2025 | 0272 रिक्त पदे | Maharashtra Anganwadi Supervisor Bharti 2025”