Pashudhan Vikas Vibhag Bharti 2025 मित्रांनो महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (MPSC) महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन, कृषी, दुग्ध व्यवसाय विकास आणि मत्स्य व्यवसाय विभागाच्या अधिपत्याखालील पशोधन विकास अधिकारी (गट-अ) पदाकरिता भरती सुरू झाली आहे. मित्रांनो ही भरती राज्य सरकारच्या मंजुरी नुसार मिळालेल्या मागणी पत्राच्या आधारे राबवण्यात आली आहे. सदर भरती मध्ये पशु विकास अधिकारी (गट-अ) या पदाकरिता तब्बल २,७९५ रिक्त जागांची भरती केली जात आहे.
MPSC Pashudhan Vikas Adhikari Bharti 2025
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (MPSC) महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन, कृषी, दुग्ध व्यवसाय विकास आणि मत्स्य व्यवसाय विभागाच्या अधिपत्याखालील पशोधन विकास अधिकारी (गट-अ) पदाकरिता तब्बल २,७९५ रिक्त पदांसाठी भरती निघाली असून, सदर भरती करता इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांना फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सदर भरतीसाठी अर्ज करणाऱ्यांना भरतीची सविस्तर माहिती, भरतीची अधिकृत जाहिरात व ऑनलाईन अर्जाची लिंक खाली देण्यात आली आहे. तर चला जाणून घेऊया सविस्तरपणे.
महत्त्वाची सूचना - सदर भरती प्रक्रियेचा अर्ज करण्यापूर्वी सर्वात आधी उमेदवारांनी दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचून घेणे गरजेचे आहे. तसेच भरतीसाठी लागणारी पात्रता व इतर बाबी संपूर्ण पडताळणी करून घ्यायची आहे. त्यानंतरच आपला अर्ज भरायचा आहे अथवा करायचा आहे. भरती संबंधित भरपूर प्रमाणामध्ये फसवणुकी होत असतात त्याकरिता उमेदवारांनी सतर्क रहावे. त्यास आम्ही जबाबदार नाही.
Pashusavardhan Vibhag Bharti 2025
भरतीचे नाव – पशुधन विकास अधिकारी भरती 2025
भरतीचा विभाग – सदर भरती ही महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) ही अधिकृत भरतीची संस्था असून, सदर भरती ही सरकारच्या अधिनस्त शासकीय सेवेमध्ये परमनंट स्वरूपाची केली जाणार आहे. मिळणारी नोकरी ही शासनमान्यता वेतनश्रेणीसह असणार आहे. तसेच उमेदवारांना विविध जिल्ह्यांमध्ये काम करण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
एकूण रिक्त पदे – पशुधन विकास अधिकारी भरती 2025 मध्ये एकूण २,७९५ रिक्त जागा भरण्यात येणार आहे.
पदाचे नाव – सदर भरती मध्ये पशुधन विकास अधिकारी (Live Devlopment Officer) हे पद भरले जाणार आहे.
शैक्षणिक पात्रता – सदर भरती करता उमेदवाराने भारतीय पशुवैद्य परिषद अधिनियम, १९८४ नुसार मान्यताप्राप्त भारतीय विद्यापीठ अथवा पशुवैद्यकीय संस्थेमधून व्हेटर्नरी सायन्स किंवा व्हेटर्नरी सायन्स हसबॅण्ड्री या शाखे मधून पदवीधर असणे आवश्यक आहे. संबंधित शिक्षणाची अरहता ही अधिनियमाच्या पहिल्या व दुसऱ्या अधिसूचनेनुसार असावी.
वयोमर्यादा – महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) अंतर्गत होत असलेल्या या भरतीमध्ये उमेदवाराची वयोमर्यादा ही किमान 18 वर्ष व कमाल 38 वर्ष देण्यात आले आहे.
दरमहा पगार – सदर भरती मध्ये निवड होणाऱ्या उमेदवारास या पदाकरता शासन मान्यता वेतन स्तर प्रमाणे रुपये ५६,१००/-दरमहा वेतन देण्यात येणार आहे. सोबतच शासनाच्या धोरणानुसार विविध भत्तेही लागू होणार आहे
अर्ज शुल्क
- खुला/सामान्य प्रवर्गाकरिता ३९४/-रुपये.
- मागासवर्गीय प्रवर्ग करिता २९४/-रुपये.
नोकरीचे ठिकाण – महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) अंतर्गत होत असलेल्या या भरतीमध्ये निवड होणाऱ्या उमेदवारास संपूर्ण महाराष्ट्रात कोणत्याही जिल्ह्यांमध्ये नोकरी मिळू शकते.
निवड प्रक्रिया – महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) अंतर्गत होत असलेल्या या भरतीमध्ये सदर पदाकरिता आयोगाच्या धोरणानुसार निवड प्रक्रिया राबवली जाणार आहे. यामध्ये ऑनलाइन परीक्षा, कागदपत्रांची पडताळणी यांचा समावेश असू शकतो. निवड प्रक्रिये बाबतची अधिक माहिती करिता उमेदवारांनी आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यायची आहे.
अर्ज पद्धत – सदर भरतीसाठी इच्छुकोपात्र असणार उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
Pashudhan Vikas Vibhag Bharti 2025 Date
अर्ज सुरू होण्याची दिनांक – सदर भरतीची ऑनलाईन अर्ज भरण्याची सुरुवात ही 29 एप्रिल 2025 पासून सुरू होणार आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – भरतीची ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 मे 2025 देण्यात आली आहे. या कालावधीनंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
Maharashtra Pashusavardhan Vibhag Bharti Application Process
असा करा अर्ज
- महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (MPSC) महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन, कृषी, दुग्ध व्यवसाय विकास आणि मत्स्य व्यवसाय विभागाच्या अधिपत्याखालील पशोधन विकास अधिकारी (गट-अ) पदाकरिता भरती सुरू झाली असून यामध्ये एकूण 2795 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. Pashudhan Vikas Vibhag Bharti 2025
- सदर वरती करता इच्छुक व पात्र असणारा उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने दिलेल्या तारखे अगोदर अर्ज करायचे आहेत.
- अर्ज करण्याची लिंक खाली दिली आहे.
- उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी दिलेली पीडीएफ जाहिरात वाचूनच अर्ज करायचा आहे,
- सदर भरतीसाठी उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी या संकेतस्थळावर जाऊन भरतीची अधिकृत जाहिरात, परिपत्रके, सूचना व विविध मेनू विभागांमध्ये असणारी माहिती काळजीपूर्वक वाचायचे आहे. तसेच त्यामध्ये देण्यात येणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, सेवा, अटी या सर्वाचा उल्लेख सविस्तरपणे करण्यात आला आहे. उमेदवारांनी भरती बाबत कोणत्याही प्रकारचा गैरसमज किंवा चुकीचा अर्ज केल्यास त्यासाठी उमेदवार स्वतः जबाबदार असेल.

वरील लेखामधील माहिती अपूर्ण असू शकते, कृपया दिलेली अधिकृत पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचूनच उमेदवारांनी अर्ज करायचा आहे.
चालू नोकर भरती जाहिरातीसाठी इथे क्लिक करा
भरतीची पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा
सदर भरतीचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा