Rayat Shikshan Sanstha Bharti 2025 मित्रांनो तुम्ही हे शिक्षण संस्थेमध्ये नोकरी शोधत असाल तर ही माहिती तुमच्याकरिता आहे. मित्रांनो तुमचेही शिक्षण दहावी ते पदवीधर झाले असेल तर तुम्हीही या भरतीसाठी अर्ज करू शकता. सदर भरती मध्ये वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळी शैक्षणिक पात्रता देण्यात आली आहे.
Rayat Shikshan Sanstha Bharti 2025
मित्रांनो शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी विविध रिक्त पदे भरण्यासाठी रयत शिक्षण संस्थेद्वारे भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर भरती मध्ये एकूण 74 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यामध्ये विविध विषयांचे शिक्षक तसेच लिपिक शिपाई व इतर पदे यांचा समावेश आहे. भरतीसाठी ची संपूर्ण माहिती म्हणजेच एकूण पदे, लागणारे शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज पद्धत, अर्ज करण्याची अंतिम तारीख व जाहिरात खाली देण्यात आली आहे.
Rayat Shikshan Sanstha Recruitment
रयत शिक्षण संस्था, सातारा उत्तर विभाग, अहिल्या नगर अंतर्गत रयत इंग्लिश मीडियम स्कूल (Self Finance Schools) मध्ये शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी विविध रिक्त पदांसाठी ही भरती आयोजित करण्यात आली आहे. सदर भरती ही अहिल्या नगर जिल्ह्यातील राहाता, श्रीगोंदा, लोणी (राहटा) व नाशिक जिल्ह्यामधील आश्केडा (बागलाण) येथील शाळांसाठी आहे.
महत्त्वाची सूचना - सदर भरती प्रक्रियेचा अर्ज करण्यापूर्वी सर्वात आधी उमेदवारांनी दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे. तसेच भरतीसाठी लागणारी पात्रता व इतर बाबी संपूर्ण पडताळणी करून घ्यायची आहे. त्यानंतरच आपला अर्ज भरायचा अथवा करायचा आहे. भरती संबंधित भरपूर प्रमाणात फसवणुकी होत असतात त्याकरिता उमेदवारांनी सतर्क रहावे. त्याकरिता आम्ही जबाबदार नाही.
भरतीचा विभाग – सदर भरती ही रयत शिक्षण संस्थेअंतर्गत केली जात आहे.
भरतीचा प्रकार – उमेदवारांना शैक्षणिक क्षेत्रात नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.
रिक्त पदे – रयत शिक्षण संस्थे अंतर्गत होत असलेल्या या भरतीमध्ये एकूण 74 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
पदे – शिक्षण संस्थेअंतर्गत होणाऱ्या या भरतीमध्ये एकूण 74 जागांमध्ये शिपाई लिपिक तसेच विविध विषयांचे शिक्षक व इतर पदे भरली जाणार आहेत.
शैक्षणिक पात्रता – या भरतीमध्ये शैक्षणिक पात्रता ही पदाच्या आवश्यकतेनुसार देण्यात आली आहे. (अधिक माहितीकरिता उमेदवारांनी जाहिरात पहायची आहे.)
दरमहा वेतन – रयत शिक्षण संस्थे अंतर्गत होणाऱ्या या भरतीमध्ये पदानुसार वेतन देण्यात येणार आहे (अधिक माहिती करिता जाहिरात वाचावी.)
अर्ज पद्धत – सदर भरती करता उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
निवड प्रक्रिया – भरतीमध्ये समाविष्ट होणाऱ्या उमेदवारांची निवड ही मुलाखती द्वारे होणार आहे.
Rayat Shikshan Sanstha Bharti 2025 Date
स्थळ –रयत शिक्षण संस्था, उत्तर विभाग बुरुडगाव रोड, अहिल्यानगर ४१४००१
तारीख – 29 एप्रिल 2025
वेळ सकाळी – १०.०० वाजता (अर्ज सादर करण्याची वेळ सकाळी ९.०० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत)
Rayat Shikshan Sanstha Bharti 2025 Application Process
असा करा अर्ज
- रयत शिक्षण संस्थे अंतर्गत 2025-26 साठी होत असणाऱ्या या भरतीसाठी व पात्र असणारा उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत.
- अर्ज करण्याचा पत्ता, अर्ज सादर करण्याची वेळ व मुलाखतीची वेळ वरती देण्यात आली आहे.
- सविस्तर माहिती करिता उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे.
- जाहिराती मध्ये देण्यात आल्याप्रमाणे उमेदवारांनी त्यांचे शिक्षण इंग्रजी माध्यमातून घेतलेले असणे आवश्यक आहे.
- तसेच कॉन्व्हेंट एज्युकेटेड उमेदवारांना यामध्ये प्राधान्य दिले जाणार आहे.
- अर्ज करण्याच्या प्रती संबंधित कार्यालयांमध्ये उपलब्ध आहेत.
- अर्ज करण्यासाठी अर्ज शुल्क 100 रुपये आहे.
- यामध्ये सर्व पदे ही तात्पुरत्या स्वरूपात असून कोणतेही शासकीय अनुदानाचा लाभ नाही.

अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
वेबसाईट साठी येथे क्लिक करा
1 thought on “शिक्षण संस्थेमध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी | पदे -074 जागा | Rayat Shikshan Sanstha Bharti 2025”