SBI Bank Bharti 2025 मित्रांनो तुम्हीही सरकारी बँकेमध्ये नोकरी शोधत आहात? तर हा लेख तुमच्यासाठी आहे. भारतामधील सर्वात मोठी व प्रतिष्ठित बँक म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI- State Bank Of India) मध्ये नवीन रिक्त पदांसाठी 2025 मध्ये मोठी भरती जाहीर केली आहे. मित्रांनो तुम्हालाही बँकिंग क्षेत्रामध्ये अधिकारी म्हणून करिअर करण्याची सुवर्णसंधी मिळवायची असेल, आणि तुम्ही या नोकरीसाठी पात्र असाल तर लगेच तुमचा अर्ज करून घ्या.
SBI Bank Recruitment 2025
भारतामधील सर्वात मोठी व प्रतिष्ठित बँक म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) अंतर्गत होत असलेल्या या भरतीमध्ये तब्बल 2964 नवीन रिक्त जागांची भरती प्रक्रिया होत आहे. या भरतीसाठी इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. सदर भरतीची जाहिरात ही बँक ऑफ इंडिया (SBI) द्वारा प्रसारित करण्यात आली आहे. बँकिंग क्षेत्रामध्ये अधिकारी म्हणून काम करू इच्छित असणाऱ्या उमेदवारांना ही एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. तर चला जाणून घेऊया या भरती बद्दलची सविस्तर माहिती.
महत्त्वाची सूचना - सदर भरती प्रक्रियेचा अर्ज करण्यापूर्वी सर्वात आधी उमेदवारांनी दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचून घेणे गरजेचे आहे. तसेच भरतीसाठी लागणारी पात्रता व इतर बाबी संपूर्ण पडताळणी करून घ्यायची आहे. त्यानंतरच आपला अर्ज भरायचा आहे अथवा करायचा आहे. भरती संबंधित भरपूर प्रमाणामध्ये फसवणुकी होत असतात त्याकरिता उमेदवारांनी सतर्क रहावे. त्यास आम्ही जबाबदार नाही.
भरतीचे नाव – स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) भरती 2025 (SBI Bank Bharti 2025)
भरतीचा विभाग – स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) द्वारा सदर भरती जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे.
भरतीचा प्रकार – भारत देशांमधील सर्वात मोठ्या सरकारी बँकेमध्ये नोकरी मिळवण्याची उत्तम संधी उपलब्ध झाले आहे.
पदाचे नाव – स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) या बँकेमध्ये होत असलेल्या भरतीमध्ये मंडळ आधारित अधिकारी (CBO) या पदाकरता भरती होत आहे.
एकूण रिक्त पदे – सदर भरती मध्ये एकूण 2964 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
लागणारी शैक्षणिक पात्रता – स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) साठी होत असलेल्या भरतीमध्ये वरील पदाकरिता उमेदवाराचे शिक्षण पदवीधर उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. (सविस्तर माहिती करता उमेदवारांनी जाहिरात पाहायची आहे.)
नोकरीचे ठिकाण – सदर भरती मध्ये निवड होणाऱ्या उमेदवारास संपूर्ण भारतभर कुठेही नोकरी मिळू शकते.
भरतीचा कालावधी – सदर भरती द्वारे परमनंट नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे.
अर्ज शुल्क
- जनरल/इ.डब्ल्यू.एस/ओबीसी करिता 750/-रुपये.
- एस.टी./एस.सी पी.डब्ल्यू.डी. करिता कोणतेही शुल्क नाही.
अर्ज करण्याची पद्धत – सदर भरती करिता इच्छुकोपात्रा असणारे उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
अर्ज करण्याची लिंक व जाहिरात खाली 👇 दिले आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – सदर भरतीसाठी उमेदवार हे 29 मे 2025 पर्यंत अर्ज करू शकतात. SBI Bank Bharti 2025
SBI Recruitment 2025 Apply Online
असा करा अर्ज
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) अंतर्गत होत असलेल्या या भरतीमध्ये एकूण 2964 रिक्त जागा भरण्यात येणार असून, यामध्ये मंडळ आधारित अधिकारी (CBO) या पदाकरता भरती होणार आहे. सदर भरतीसाठी इच्छुक खूप पात्र असणाऱ्या उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
अर्ज करण्याची लिंक व अधिकृत जाहिरात खाली दिली आहे.
उमेदवारांनी अर्ज करण्या अगोदर दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करायचा आहे.
पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना अर्ज करण्यापूर्वी पदासाठीची जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या पात्रता व इतर निकष तारखेनुसार पूर्ण केले आहेत किंवा नाही हे सर्व तपासून घ्यावे.
सदर भरती करता इच्छुक व पात्र उमेदवारांनी एकापेक्षा जास्त अर्ज सादर करू नयेत. एकापेक्षा अधिक अर्ज च्या बाबतीत फक्त शेवटचा पूर्ण केलेला अर्ज ठेवला जाईल इतर नोंदणीसाठी भरलेले अर्ज शुल्क/सूचना जप्त केले जातील. SBI Bank Bharti 2025
उमेदवारांना भरतीची माहिती प्राप्त करण्याकरिता आपला ईमेल आयडी तसेच मोबाईल क्रमांक सक्रिय ठेवण्याचा सल्ला दिला जाईल.

वरील लेखातील माहिती अपूर्ण असू शकते, कृपया दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करायचा आहे.
चालू नोकर भरती जाहिरातींसाठी क्लिक करा.
अधिकृत पीडीएफ जाहिरात पाहण्याकरिता क्लिक करा.
भरतीचा अर्ज करण्यासाठी क्लिक करा.
1 thought on “स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! | तब्बल 02964 रिक्त जागा | SBI Bank Bharti 2025”